महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 27, 2021, 8:55 PM IST

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल पुन्हा 'लॉकडाऊन'

औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. 30 मार्च ते 8 एप्रिल या काळात अटी-शर्तींनुसार कडकडीत बंद पळाला जाणार आहे.

aurangabad
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. 30 मार्च ते 8 एप्रिल या काळात अटी-शर्तींनुसार कडकडीत बंद पळाला जाणार आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने घेतला निर्णय

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालले असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत एकंदरीतच जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला होता. त्याच वेळी सुभाष देसाई यांनी जिल्ह्यात टाळेबंदीचे संकेत दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याची स्थिती जाणून घेण्यात आली. शहरातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी (दि. 27 मार्च) सायंकाळी टाळेबंदी करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार 30 मार्चच्या रात्री बारा वाजेपासून ते आठ एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत टाळेबंदी लावण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

असे असतील निर्बंध

टाळेबंदीच्या काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. खासगी सरकारी सर्व वाहनांना या काळात बंदी असेल. जलतरण तलाव, जिम, हॉटेल या सुविधा पूर्णपणे बंद असतील. सामाजिक राजकीय धार्मिक इत्यादी कार्यक्रमावर पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. खासगी-सरकारी वैद्यकीय सेवा पूर्णपणे सुरू असतील. या काळात किराणा दुकानदार, दूध, भाजीपाला, वृत्तपत्र विक्रेते यांना दुपारी बारा वाजेपर्यंत विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. उद्योग व्यवसायांना मात्र यातून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे सुरू असेल. अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा -औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक, एका खाटावर दोन रुग्णांना उपचार

ABOUT THE AUTHOR

...view details