महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे - लेफ्टनंट जनरल निम्भोरकर - lieutenant general nimbhorkar

आमची प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे कोणतीही संघटना नाही. त्यामुळे कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तरी आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत नाही आणि तेच योग्य आहे. सैन्य २०० टक्के काम करत असल्याचे मत लेफ्टनंट जनरल निम्भोरकर यांनी व्यक्त केले.

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे - लेफ्टनंट जनरल निम्भोरकर

By

Published : Apr 21, 2019, 11:54 AM IST

औरंगाबाद- एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक हे सैन्याच्या शौर्याचे व मनोधैर्याचे परमोच्च बिंदू होते. त्यामुळे त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे होय, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निम्भोरकर यांनी केले. मास्टर जनरल ऑफ ऑर्डिनन्स आणि उरी सर्जिकल स्ट्राईकचे जनक, लेफ्टनंन्ट जनरल राजेंद्र निम्भोरकर यांचे व्याख्यान विवेक मंच या संस्थेने आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे - लेफ्टनंट जनरल निम्भोरकर

एअर स्ट्राईकमध्ये किती जण मारले गेले यात काही अर्थ नाही. आपण एअर स्ट्राईक केले हे महत्त्वाचे आहे. त्याठिकाणी ३०० ते ३५० मोबाईल होते. ते कारवाईनंतर बंद झाले. याचा अर्थ समजून घ्या, असेही ते म्हणाले. जर काही झालेच नाही, तर पाकिस्तानने ४० दिवसांपर्यंत त्या जागेवर का कोणाला जाऊ दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सर्जिकल स्ट्राईकवर अनेकजण प्रश्न उपस्थित करत असताना सैन्य त्यांना का उत्तर देत नाही, असा प्रश्न प्रेक्षकवर्गातील एका नागरिकाने उपस्थित केला. या प्रश्नाच्या उत्तरात आमची प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे कोणतीही संघटना नाही. त्यामुळे कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तरी आम्ही त्यावर प्रतिक्रिया देत नाही आणि तेच योग्य आहे. सैन्य २०० टक्के काम करत असल्याचे मत राजेंद्र निम्भोरकर यांनी व्यक्त केले.
राफेल करार हा दोन देशांमधील करार असून त्यात कोणीही दलाल नव्हता. त्यामुळे भ्रष्टाचाराची तसूभरही शंका नाही. मात्र, पाच वर्षांत खरेदी पूर्ण झाली नाही, तर किंमत ५ टक्क्यांनी वाढते. त्यावेळचा युरोचा भाव आणि आजचा भाव पाहता डिल महाग नाही, हे नक्की, असे स्पष्टीकरण त्यांनी राफेल करारावर दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details