औरंगाबाद - शहरातील एन 1 सिडको येथील काळा गणपती मंदिराच्या मागील जॉगिंग ट्रॅकवर मंगळवारी सकाळी नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आज सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात पथकाला यश आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे.
सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद; स्थानिकांचा सुटकेचा निश्वास हेही वाचा - 'नाणार' विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
नेहमीप्रमाणे आज सकाळी सात वाजताच्य सुमारास येथील नागरिक सिडको एन 1 परिसरातील उद्यानात मॉर्निग वॉकला गेले असता तेथे त्यांना एक बिबट्या दिसला. हा बिबट्या गार्डनमध्ये फिरत होता. त्यावेळी नागरिकांनी तेथून पळ काढला व ही माहिती वन विभागाला दिली. वनविभागाचे पथक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. बिबट्या परिसरातील एका घरामध्ये दडून बसला होता. वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस त्यास पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न होते.
हेही वाचा - फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी