औरंगाबाद -राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. हेक्टरी 8 हजारांची जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणारी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता किमान 50 हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना हवी होती. मात्र हेक्टरी 8 हजारांची मदत दिल्याने शेतकऱ्यांना आलेला खर्च देखील निघणे शक्य नाही. त्यात फक्त दोन हेक्टर शेती असलेल्याच शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याचा काय फायदा असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला आहे.