औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. 24 तासात कोरोनामुळे चौघांना मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 30वर गेली आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये 32 वर्षीय युवकाचा समावेश आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील बाधा झाल्याच समोर आले आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत आठ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादमध्ये 24 तासात कोरोनामुळे चौघांना मृत्यू; एकूण मृतांची संख्या 30वर - aurangabad corona update
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. 24 तासात कोरोनामुळे चौघांना मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 30 वर गेली आहे.
जलाल कॉलनीतील 32 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर संजय नगर येथील महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. 52 वर्षीय ही महिला असून, तिला उच्च रक्तदाब होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तसेच 35 वर्षीय एका महिलेचा सकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रौफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला.
संबंधित रुग्ण 15 मे रोजी घाटीत भरती झाले होते. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांच्यावर घाटीच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. मात्र, उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा आज सकाळी सव्वा नऊ वाजता मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आजारही होता, त्यामुळे आतापर्यंत 30 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.