महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, प्रशासनाचा चोख बंदोबस्त - घृष्णेश्वर मंदिर

देशातील ११ ज्योतिर्लिंग उत्तराभिमुख असून १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे पूर्वाभिमुख आहे.

आरती करताना भाविक

By

Published : Mar 4, 2019, 9:06 AM IST

औरंगाबाद- सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. १२ वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात रात्रीपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेले हे घृष्णेश्वर मंदिर आहे.

संबंधित व्हिडीओ

या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल होत नाही, अशी आख्यायिका आहे. देशातील ११ ज्योतिर्लिंग उत्तराभिमुख असून १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे पूर्वाभिमुख आहे. ११ ज्योतिर्लिंगांना प्रदक्षिणा अर्धी घातली जाते. मात्र, घृष्णेश्वराला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. घृष्णेश्वर मंदिरचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येऊन बेल फुल वाहून आपली मानोकामना मागतात. महाशिवरात्रीला मध्यरात्रीपासून भाविक अभिषेक करत महापूजा करून महादेवाची आराधना करतात.

यावर्षी महाशिवरात्री निमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details