औरंगाबाद - डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला आहे. दिक्षाभूमीतून शिक्षाभूमीत येण्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केली.
डॉ. प्रमोद येवले यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला - BAMU
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाचे नाव राज्यात नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारताना व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाचे नाव राज्यात नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. येवले यांनी मंगळवार (दि.१६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी हा माझ्यासाठी एक ऐतिहासिक क्षण असून नावलौकिक मिळालेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मला देण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीकडून शिक्षा भूमीकडे मी आलोय याचा मला आनंद आहे. जी जबाबदारी मला सोपवली आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडून प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करण्याचा प्रयत्न मी करेल. अडचणी या अनेक ठिकाणी असतात. त्यात मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अनेक विद्यापीठे ही मागासलेली आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध करून देत न्याय देण्याचे आव्हान समोर असणार आहे. माझ्या कालावधीत राज्यस्तरीय नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक होईल. यासाठी मी प्रयत्न करीन. लोकशाहीत अनेक संघटना या न्यायासाठी काम करतात त्यांनादेखील सोबत घेऊन योग्य त्या मागण्यांचा विचार केला जाईल, असेही डॉ. येवले यावेळी म्हणाले.