महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Obscene Stunts On Motorcycle : 'तडप' चित्रपटाचा ट्रेलर बघून मित्रांचं चॅलेंज स्वीकारत केला स्टंट - तडप चित्रपटाचा ट्रेलर

औरंगाबादेत प्रेमी जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल ( Viral Video Aurangabad ) झाला होता. ज्यामध्ये दुचाकीवर बसलेल्या आपल्या प्रियकराच्या मांडीवर बसून एक तरुणी अश्लीलपणा करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी किसिंग स्टंट ( Kissing Stunts on Motorcycle ) करणाऱ्या त्या तरुणाला अटक केली. मित्रांसोबत पैज लावल्याने हा स्टंट केल्याचे त्या युवकाने सांगितले.

Kissing Stunts on Motorcycle
Kissing Stunts on Motorcycle

By

Published : Jan 5, 2022, 12:11 PM IST

Updated : Jan 5, 2022, 2:46 PM IST

औरंगाबाद- रहदारी असलेल्या रस्त्यावर चालू दुचाकीवर चित्रपटात सिन देतात तसच वावरणाऱ्या प्रेमी जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल ( Viral Video Aurangabad ) झाला होता. ज्यामध्ये दुचाकीवर बसलेल्या आपल्या प्रियकराच्या मांडीवर बसून एक तरुणी अश्लीलपणा करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी किसिंग स्टंट ( Kissing Stunts on Motorcycle ) करणाऱ्या त्या तरुणाला अटक केली. मित्रांसोबत पैज लावल्याने हा स्टंट केल्याचे त्या युवकाने सांगितले.

पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी याबद्दल माहिती दिली

चित्रपटाप्रमाणे स्टंट करण्याची पैज -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज गौतम कांबळे (वय २३) असे अटकेतील स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत बसलेला असतांना 'तडप' सिनेमाचे ट्रेलर ( Tadap Movie Trailer ) पाहिला. याचवेळी सुरजला मैत्रिणीची फोन आला. बराच वेळ फोनवर बोलत असल्याने, मित्रांनी त्याला स्टंट करण्याचे चॅलेंज दिले आणि सूरजनेही हे चॅलेंज स्वीकारत प्रेयसीला बोलावून घेतले. त्यानंतर त्याचवेळी शहरातील क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती चौक असा ( Kranti Chauk ) प्रवास करत स्टंट केला. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी हा स्टंट मोबाईलमध्ये कैद करत व्हायरल केला.

व्हिडिओ समोर येताच युवकाला अटक -

व्हिडिओमध्ये असलेली युवती सुरजची नातेवाईक असून त्यांचा विवाह होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समाजमाध्यमांवर विडिओ व्हायरल होताच, त्या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. पोलिस या तरुणाचा शोध घेत असतानाच शहरातील जिंसी परिसरातील एका हॉटेल जवळ चहा पित असल्याचे पोलिसांना कळलं. त्याचवेळी जिन्सी पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाई पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली.

Last Updated : Jan 5, 2022, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details