कन्नड (औरंगाबाद) : 'भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये उद्भवलेले कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे' असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत 'कन्नड तालुका गटसचिव कर्मचारी सहकारी पतसंस्था' यांच्यातर्फे संस्थेचे चेअरमन बाळासाहेब दौड यांच्यासह व्हाईस चेअरमन के. के. मोरे, सचिव भास्कर जाधव आणि खजिनदार रवी सोनवने यांनी तातडीने सहाय्यक निबंधक अर्चना वाडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 हजारांची मदत 'आरटीजीएस'द्वारे पाठवली आहे.
'कन्नड तालुका गटसचिव कर्मचारी सहकारी पतसंस्थे'तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत - बाळासाहेब पाटील
संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आवश्यक ती सेवा देणाऱ्या यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. कोरोनाविरोधातील या लढ्यात 'कन्नड तालुका गटसचिव कर्मचारी सहकारी पतसंस्था'तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 21 हजारांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कन्नड तालुका गटसचिव कर्मचारी सहकारी पतसंस्था
हेही वाचा....ईटीव्ही भारत विशेष : महाराष्ट्रातल्या 'या' आठ जिल्ह्यात एकही नाही कोरोनोचा रुग्ण