महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा संघटनांनी बसवला काकासाहेब शिंदेंचा पुतळा - Kakasaheb Shinde

मराठा आरक्षणासाठी प्राण देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा गोदावरी नदी पुलावर मराठा संघटनांनी पुतळा बसवला आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुतळा बसवण्यात आला. काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात प्राण गमावले होते.

मराठा संघटनांनी बसवला काकासाहेब शिंदेंचा पुतळा

By

Published : Jul 23, 2019, 11:57 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:50 PM IST

औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी प्राण देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा गोदावरी नदी पुलावर मराठा संघटनांनी पुतळा बसवला आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुतळा बसवण्यात आला. काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात प्राण गमावले होते.

2018 मध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत असताना, कायगाव टोका येथील गोदावरी नदी पत्रात पुलावरून काकासाहेब शिंदेने उडी घेऊन घेतली होती. पोलीस आणि शासकीय यंत्रणेने खबरदारीचे उपाय न घेतल्याने काकासाहेब शिंदे यांना वेळेवर बाहेर काढणे शक्य झाले नाही. यात काकासाहेबांना प्राण गमवावे लागले. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर जवळपास 42 तरुणांनी राज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या.

मराठा संघटनांनी बसवला काकासाहेब शिंदेंचा पुतळा

काकाहेब शिंदे यांच्या मृत्यूला एक वर्षपूर्ण झाले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पहिला बळी काकासाहेबाच्या रुपाने गेला होता. काकासाहेबचे बलिदान स्मरणात रहावे यासाठी काकासाहेब शिंदे याचा पुतळा बसवला आहे. 22 जुलैला रात्री 11 च्या सुमारास मराठा संघटनांनी एकत्र येत पुतळा बसवत काकासाहेब शिंदे अमर रहेच्या घोषणा दिल्या. 23 जुलै रोजी दिवसभर विविध पक्ष संघटना काकासाहेब शिंदे यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी कायगवच्या पुलाजवळ येणार असल्याने पोलीस यंत्रणेने काही उपाययोजना केल्या आहेत.

Last Updated : Jul 23, 2019, 2:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details