छत्रपती संभाजीनगर :रशिया एक महाशक्ती म्हणून जागतिक स्तरावर ओळखली जाते. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन राहत असलेले ठिकाण हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानला जाते. मात्र असे असले तरी बुधवारी रात्री दोन ड्रोन द्वारे तिथे हल्ला केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यांच्याकडे असलेली यंत्रणा पाहता मोठे मिसाईल पाडण्याची क्षमता, ड्रोन दोन रोधक असलेली यंत्रणा तिथे कार्यान्वित आहे. त्यामुळे हा हल्ला प्रथम दर्शनी तरी इतर कोणी केला असावा याची शक्यता नाकारता येते. युक्रेन सारखा छोटा देश एवढी मोठी गोष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे या कृतीत साशंकता व्यक्त करायला हरकत नाही. जागतिक पातळीवर सहानुभूती मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो असे मत डॉ. ढगे यांनी व्यक्त केले
सहनभुती मिळवण्यासाठी प्रयत्न: नऊ मे रोजी व्हिक्ट्री डे साजरा केला जातो, त्यासाठी जगभरातून अनेक नेते अधिकारी रशियामध्ये येत असतात. याच काळात झालेला हल्ला ही गांभीर बाब देखील मानली जाते असे मत डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या चौदा महिन्याच्या काळात युक्रेन अध्यक्ष झेलस्की यांनी प्रति हल्ला करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे प्रतिउत्तर देताना रशियाला आक्रमकता वाढवावी लागणार आहे. मात्र त्यात युद्धाच्या काळात रशियन नागरिकांकडून पुतीन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्याला उत्तर देण्यासाठी आता भूमिका घेणे आवश्यक असून, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे. तर युद्ध लादल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर लावण्यात येणारे निर्बंध पाहता, सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे नीती राबवली जाण्याची शक्यता आहे. आमच्या अध्यक्षांवर हल्ला झाला आता आम्ही आक्रमकपणे उत्तर देऊ असा इशारा, या निमित्ताने देण्यात येत असल्याचे संकेत यातून मिळत असल्याच देखील ढगे यांनी सांगितले.