महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत दोघांनी गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा - sachin jire

औरंगाबादेतील २८ वर्षीय तरूणाची आणि ४५ वर्षीय इसमाची गळफास घेऊ आत्महत्या. दोन्ही आत्महत्येतील कारण गुलदस्त्यात

मृत विजय आणि एकनाथ

By

Published : May 12, 2019, 2:58 PM IST

औरंगाबाद - फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एका तरूणाने हडको भागात तर एका ट्रकचालकाने भानुदासनगरमध्ये राहत्याघरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन्ही आत्महत्येतील कारण गुलदस्त्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मृताला घेऊन जाताना


विजय सुनील चव्हाण (वय-28 वर्षे, रा.श्रीकृष्ण नगर, हुडको-एन9) असे फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर एकनाथ गोविंदराव राऊत (वय-45, वर्षे,रा. भानुदासनगर,जवाहरनर) असे ट्रक चालकाचे नाव आहे.

मृत विजय हा शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. 4 मे रोजी त्याच्या लग्नाला एकवर्ष पूर्ण झाले होते. शनिवारी रात्री सुनीलने त्याच्या खोलीत छताच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. नेहमी आनंदी राहणाऱ्या तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार रमेश जाधव करीत आहे.


तर, एकनाथ राऊत यांची सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे एक एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी ट्रक फायनान्सवर घेतला आहे. मात्र, काही हफ्ते भरणा न झाल्याने फायनान्स कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेतात जाऊन विचारपूस केली. ही बाब त्यांना समजल्यापासून ते नैराश्यात होते. काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या मुलीने पहिल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार सुदाम दाभाडे करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details