महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना कार्यकर्त्यांवरदेखील गुन्हे दाखल करा, पोलीस सत्ताधाऱ्यांना घाबरतात का?

आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले तसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांना दिला आहे.

Imtiyaz Jaleel
शिवसेना कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करा, अन्यथा न्यायालयात जाऊ; खासदार जलील यांचा इशारा

By

Published : Sep 3, 2020, 5:15 PM IST

औरंगाबाद - आम्ही मंदिरात गेलो म्हणून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करता, तसे गुन्हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही दाखल करा. अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांना दिला आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांना घाबरतात का? असा सवालही जलील यांनी विचारला आहे.

खासदार जलील बोलताना...

काय आहे प्रकरण -

एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. धार्मिक स्थळे न उघडल्यास आपण १ तारखेला औरंगाबादमधील मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदने देण्यात असल्याचेही सांगितले होतं. त्यानुसार जलील हे १ तारखेला खडकेश्वर मंदिरात येऊन पुजाऱ्यांना निवेदन देणार होते. तेव्हा शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे हे आपल्या कार्यकर्तांसह खडकेश्वर मंदिराजवळ पोहोचले. यामुळे तणाव निर्माण झाला. तेव्हा पोलिसांनी जलील यांना अडवत एमआयएम कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.

1 सप्टेंबरला आम्ही मंदिर बंद करा, अशी मागणी घेऊन गेलो नव्हतो. त्यामुळे आम्हाला विरोध करण्याची गरज नव्हती. मात्र, शिवसेनेने तिथे येऊन शहराचं वातावरण खराब करण्याच काम केलं. आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केले. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, मात्र तिथे असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करायला हवेत. मात्र, पोलीस सत्ताधाऱ्यांना घाबरत आहेत, असे वाटते. जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर शिवसेनेवर पण करा. अन्यथा कारवाई विरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांना दिला.

धार्मिकस्थळे उघडा ही मागणी नागरिकांची आहे. काही लोक मंदिर उघडण्यासाठी तर काही लोक मशीद उघडण्याची विनंती करण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यानुसार आम्ही पूर्व सूचना देऊन मंदिर किंवा मशीदीत जाणार होतो. धार्मिक स्थळांसमोर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना सरकारने दहा हजार रुपये मदत म्हणून द्यावे, आम्ही आमचे आंदोलन मागे घेऊ, असेही खासदार जलील यांनी संगितले.

हेही वाचा -आजचे आंदोलन स्थगित पण...खासदार जलील यांनी दिला 'हा' इशारा

हेही वाचा -राज्य सरकारला मराठा आरक्षण नको आहे का, असा प्रश्न पडतो - विनोद पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details