महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार इम्तियाज जलीलांसह समर्थकांना पडला कोरोना विसर; लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष - auranagabad lockdown-canceled

एकीकडे औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि दुसरीकडे जलील यांच्याकडून मोडण्यात आलेल्या कोरोना नियमांमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

इम्तिआज जलील
इम्तिआज जलील

By

Published : Mar 31, 2021, 1:51 PM IST

Updated : Mar 31, 2021, 3:41 PM IST

औरंगाबाद -जिल्ह्यात लॉकडाऊन तूर्तास स्तागित करण्यात करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्ते मोठी गर्दी करत जल्लोष करत होते. मात्र, या जल्लोषादरम्यान कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. यावेळी अनेकांनी मास्क लावले नव्हतेच सोबतच सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडवला होता. या जल्लोषाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खासदार इम्तियाज जलीलांसह समर्थकांना पडला कोरोना विसर

खासदार जलीलांना पडला कोरोनाचा विसर
31 मार्च रोजी होणाऱ्या लॉकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. या निर्णयामुळे आनंदित झालेले औरंगाबादकरांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानासमोर गर्दी केली. लॉकडाऊन स्थगित करण्यात आलेल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी जलील यांना खांद्यावर उचलून घेतले. जलीलही या आनंदात सहभागी झाले. मात्र, यादरम्यान कार्यकर्त्यांसोबत जलील यांनाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून आले. या गर्दीत सहभागी एकानेही मास्क लावला नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील यांनीही मास्क परिधान केला नव्हता. सोबत सोशल डिस्टन्सिंग चाही फज्जा उडवण्यात आल्याच पहायला मिळाले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना वेगळा नियम आणि लोकप्रतिनिधींना वेगळा आहे का? असा सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा -शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना मिळाली संधीockdown-canceled

Last Updated : Mar 31, 2021, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details