महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्राने बायकोसोबत व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रिनशॉट दाखवल्याने पत्नीचा गळा आवळून खून - स्क्रिनशॉट

दारू पित असताना मित्राने मित्राच्या पत्नीला केलेल्या व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रिनशॉट दाखवले यावरून संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.

मृत पत्नी व आरोपी पती

By

Published : Sep 15, 2019, 5:10 PM IST

औरंगाबाद- तीन मित्र दारू पित बसले असताना त्यातील एकाने दुसऱ्या मित्राच्या पत्नीसोबत केलेली व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रीन शॉट दाखवले. त्यावर संतापलेल्या पतीने पत्नीला जाब विचारला. त्यावेळी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले अन् त्याने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. ही घटना औरंगाबादेतील मुकुंदवाडी भागात घडली.

पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून


आरती राहुल गवळी (वय १९ वर्षे) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर राहुल दिनकर गवळी, मंगेश गवळी, मनोज उर्फ मन्या थोरात अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.

मृत आरती आणि तिचा पती राहुल हे दोघेही मुंबई येथे राहत होते. काही महिन्यांपूर्वीच ते औरंगाबाद येथे राहायला आले होते. मुकुंदवाडी परिसरात ते भाड्याने राहत होते. पती-पत्नीमध्ये नेहमीच वादा होत होता, अशी माहिती समोर आली आहे. राहुल हा लिफ्ट दुरुस्तीचे काम करत होता. तो रात्रीच्या वेळी मित्र मंगेश आणि मनोज सोबत दारू पित असताना मोबाईल काढला व राहुलच्या पत्नीसोबत केलेल्या व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रीनशॉट राहुलला दाखवले ते पाहून राहुल संतापला आणि त्याने तेथून काढता पाय घेत घर गाठले.

हेही वाचा - महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून ३० जणांना गंडविले

घरी आल्यावर त्याने पत्नीला याबाबत विचारपूस केली असता आरती व राहुल या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, राहुलने गळा आवळून आरतीची हत्या केली. त्यानंतर दरवाजा बंद करून पसार झाला. पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - वैजापूर तालुक्यात किरकोळ वादातून महिला वाहकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details