छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Houthi Rebels Attack : लाल समुद्रात जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे महागाई वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे (Doctor Dhage) यांनी वर्तवली आहे. देशात ८५% टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. त्यावर मोठा परिणाम होईल. त्याच बरोबर निर्यात करताना देखील वस्तूची दरवाढ होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या त्याचे परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यात होतील; मात्र असे हल्ले तिकडून देशावर होण्याची शक्यता नाही, असं देखील डॉ. ढगे यांनी सांगितलं.
महागाई वाढण्याची शक्यता :हुती विद्रोही लाल समुद्रात जहाजांवर ड्रोन हल्ला करत आहेत. याचा खूप मोठा परिणाम भारतीय बाजारपेठांवर होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस, बासमती तांदूळ, वस्त्र उद्योग, पेट्रोलियम पदार्थ यांच्या व्यापारावर परिणाम अधिक होण्याची शक्यता लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी वर्तवली आहे. विशेष करून युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय व्यापार करताना अडचण निर्माण होणार आहे. लाल समुद्रातून जाताना जहाजांवर होणारे हल्ले यामुळे मार्ग बदलावा लागेल. जर तसं करावं लागलं तर जवळपास ३५०० सागरी मैल एवढं अधिकचं अंतर कापावं लागेल. त्यामुळे वस्तुशुल्क वाढतीलच, त्याचबरोबर दोन ते तीन आठवड्यांचा प्रवास अवधी आयात-निर्यातसाठी वाढेल. यामुळे अधिकचा होणारा खर्च महागाईच्या रुपात सर्वसामान्यांना भरावा लागेल. विशेषतः भारत ८५% पेट्रोलियम पदार्थ बाहेरून आयात करतो. त्याच्या किंमती वाढल्यास महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल अशी भीती डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केली. (Petroleum Products Expensive)