Coronavirus : हिलाल कॉलनीत आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह.. औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर - लॉकडाऊन
औरंगाबादेत शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले असताना शनिवारी पहाटे तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात समोर आले. त्यामुळे औरंगाबादेत रुग्ण संख्या 47 वर पोहचली आहे.
औरंगाबाद - औरंगाबादेत कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले असताना शनिवारी पहाटे तीन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात समोर आले. त्यामुळे औरंगाबादेत रुग्ण संख्या 47 वर पोहोचली आहे.
औरंगाबादच्या हिलाल कॉलनीत एकाच कुटुंबातील तीन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी हिलाल कॉलनीत कोरोनामुळे मृत्यू झलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याने या महिलांना बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. शहरात समतानगर सोबत हिलाल कॉलनी कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औरंगाबादेत कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी सहा रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्याने आनंद व्यक्त केला जात असताना शुक्रवारी चार तर शनिवारी सकाळीच तीन रुग्ण आढळून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. आता पर्यंत 22 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 20 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.