औरंगाबाद- पैठण शहरातील नगरसेविकेच्या उच्चशिक्षीत सुपुत्रांनी प्रशासनाच्या निषेधासाठी गटारीची स्वछता केली. ही अनोखी स्वच्छता मोहीम राबवून नगर परिषद प्रशासनाचा त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.
प्रशासनाच्या निषेधासाठी उच्चशिक्षित तरुणांनी केली गटारीची स्वछता
नगरपालिका स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाकडे साफसफाई करण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र तरीही स्वच्छता न झाल्याने नगरसेविकेच्या उच्चशिक्षीत सुपुत्रांनी प्रशासनाच्या निषेधासाठी गटारीची स्वछता केली.
पैठण शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत चालला असून नगर परिषद प्रशासनाला सांगुनही प्रभाग 11 मध्ये स्वच्छता होत नाही. त्यामुळे संतप्त नगरसेविका पुष्पा वानोळे यांच्या दोन्हीही मुलांनी खोरे हातात घेऊन तुंबलेल्या नाल्यातील घाण काढून प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवल्या.
नगरसेविकेचा मोठा मुलगा संग्राम वानोळे हा पेशाने वकील असून दुसरा मुलगा सम्राट वानोळे हा उच्चशिक्षित आहे. असे असताना नगर परिषद प्रशासनाचा निषेध करत या दोघांनी प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्या या मोहीमेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.