औरंगाबाद -शिवसेनाआमदार हर्षवर्धन जाधव हे शिवस्वराज्य पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या ३० तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती हर्षवधन जाधव यांनी दिली.विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना हरवण्यासाठी सर्वांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन जाधव शिवस्वराज्य पक्षाकडून लढवणार लोकसभा
यावेळी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य पक्षाकडून निवडूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. खैरे यांना या निवडणुकीत हरवल्याशिवाय मी राहणार नाही असेही जाधव यांनी सांगतले.
खा. चंद्रकांत खैरे यांचे दिल्लीत संबंध असल्याने त्यांनी आपल्या विरोधात कमकुवत उमेदवार द्यायला लावल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर अन्याय झाला असून मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सत्तार यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतल्याचे हर्षबर्धन जाधव यांनी सांगितले.
३० मार्च रोजी दुपारी एक वाजता शिवराज्य बहुजन पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सर्व धर्मीय मतदारांची सहा ते साडे सहा लाख मते मिळतील असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाने स्वतःहून बाहेरून पाठिंबा दिला तर मी घेईल असेही त्यांनी सांगितले. आमदार इम्तियाज जलील यांच्याशी मैत्री असून आम्ही दोघेच सुशिक्षित उमेदवार असल्याचे जाधव म्हटले. आता मागे हटणार नसून खैरे यांना या निवडणुकीत हरवल्याशिवाय मी राहणार नाही असेही त्यांनी सांगतले. यावेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी काँग्रेसवर टीका केली.