औरंगाबाद - शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गुलमंडी भागात काहीकाळ तणाव पाहायला मिळाला. शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करत होणारा वाद मिटवत हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थकांना वाट करून दिली.
हर्षवर्धन जाधव-चंद्रकांत खैरे समर्थक आमने-सामने; परिसरात काही काळ तणाव
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गुलमंडी भागात काहीकाळ तणाव पाहायला मिळाला.
औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे हर्षवर्धन जाधव यांची देखील मिरवणूक निघणार होती. चंद्रकांत खैरे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरत असताना हर्षवर्धन जाधव मिरवणुकीसाठी क्रांती चौक भागात कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यावेळी खैरे-जाधव कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी पोलिसांनी जाधव यांना वाट बदलून जाण्याची विनंती केली. मात्र, परवानगी असल्याने त्यांनी आपला मार्ग बदलण्यास विरोध केला. त्यामुळे वाद होणार, अशी शक्यता होती.
मात्र, त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करत हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांना वाट काढून देत वाद टाळला. त्यानंतर क्रांतीचौक येथून गुलमंडी अशी मिरवणूक काढली. मिरवणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कोणासोबत आपला वाद नसून शहराच्या विकासासाठी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.