महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Crime : उसाच्या शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह ; घातपाताची शक्यता व्यक्त - घातपाताची शक्यता

वाळूज येथील रहिवाश्याचा मृतदेह ढोरेगाव परिसरातील एका शेतात अर्धनग्ण अवस्थेत आढळून (half naked dead body found) आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील प्रकाश जमदाडे असे मृत व्यक्तीचे नाव (dead body found in farm) आहे. घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत (Dhoregaon in Aurangabad) आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Aurangabad Crime
सुनील प्रकाश जमदाडे

By

Published : Jan 3, 2023, 10:21 AM IST

औरंगाबाद :गंगापुर तालुक्यातील औरंगाबाद नगर महामार्गाजवळ ढोरेगाव शिवारातील पेंडापूर फाट्याजवळ गट नंबर १२ मधील असलेल्या उसाच्या शेतात एका व्यक्तीचा अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह आढळून (dead body found in farm) आला. त्यामुळे ढोरेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील प्रकाश जमदाडे (Sunil Prakash Jamdade), राहनार पाटोदा तालुका औरंगाबाद असे उसाच्या शेतात आढळलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. जलशुद्धीकरण पाणी पुरवठा एमआयडीसी वाळूज महानगर येथे कामगार म्हणून कार्यरत (Dhoregaon in Aurangabad) होते.



शेतमजुराला दिसला मृतदेह :औरंगाबाद पुणे महामार्गावर पेंडापूर फाट्या जवळच ढोरेगाव शिवारातील गट नंबर १२ मधील शेतात सिताराम धिवर हे शेतमजूर सकाळी सात वाजेदरम्यान ऊसाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले (Aurangabad Crime) होते. तेव्हा त्यांना उसाच्या शेतात अर्ध नग्न व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती जमीन मालक धरमसिंग राजपूत यांना दिली. त्यानंतर राजपुत यांनी तात्काळ घटनेची माहिती गंगापूर पोलीसांना देताच प्रभारी पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस नाईक कैलास निंभोरकर, बीट जमादार अमित पाटील, बलवीरसिंग बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेत (half naked dead body found) घेतली.



पॅनकार्डमुळे पटली मृतदेहाची ओळख :पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मृत व्यक्तीच्या खिश्यात पॅन कार्ड बँकेची पेमेंट स्लिप आढळून आल्याने मृताची ओळख पटली. सुनील प्रकाश जमदाडे वय ४० वर्ष रा .पाटोदा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली असता नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी मृतदेह पाहून नातेवाईकाने आक्रोश (half naked dead body found in farm) केला.



तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात :घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह उतरणीय तपासणीसाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची तपासणी झाल्यानंतर पुढील तपासला गती मिळणार असल्याचे पोलिसांनी (body found in farm Dhoregaon) सांगितले.


घातपात असण्याची शक्यता ?औरंगाबाद नगर महामार्गावरील पेंडापूर फाट्याजवळील उसाच्या शेतात मृतदेह आढळला. मृतदेहाच्या डोक्याला इजा झाल्याने रक्तस्राव झालेला होता. हा घात-पात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासाअंती घटनेची माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी नातेवाईकाच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत (half naked dead body) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details