औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावात शरीरसुखाला नकार देणाऱ्या महिलेला एका नराधमाने जिवंत जाळले होते. या घटनेत प्रचंड भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या कुटुंबीयांची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य सचिव तथा राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी भेट घेतली. यानंतर औरंगाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मधुकर कांबळे यांनी, मृत पीडितेच्या मुलीला सरकारी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू असे म्हटले आहे.
राज्यमंत्री मधुकर कांबळे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... 'मंत्रालयात बसून आपल्या वेदना मी समजू शकत नाही, म्हणून प्रत्यक्ष भेटायला आलोय'
सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली होती. एका नराधमाने महिलेच्या घरात घुसून तिच्याजवळ शरीरसुखाची मागणी केली होती. तिने शरीरसुखाला नकार देताच, नाराधमाने त्या महिलेला जिवंत जाळले. यात 95 टक्के भाजलेल्या त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
हेही वाचा... 'राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरचा सल्ला घेणे कधी सोडायचं नाही'
शनिवारी राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी स्वतः अंधारी या गावात जाऊन मृत पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना चार लाख 12 हजार रुपये आर्थिक मदत दिली. त्याच बरोबर मृत पीडितेच्या मुलीला सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येईल. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, तशी विनंती केली असल्याची माहिती मधुकर कांबळे यांनी दिली.