माहिती देताना योगेश गोराडे छत्रपती संभाजीनगर - (औरंगाबाद)कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप गेल्या काही दिवसांमध्ये केले जात आहेत. त्यात त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सैन्यातील जवानाची जमीन हडपल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी आसपासच्या जमिनीचे बक्षीस पत्र लिहून घेतले, ज्यांनी त्यांना जामीन देण्यास नकार दिला, त्याठिकाणी त्यांनी जमीन हडपल्या असून त्यातून सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
कारवाई कधी होणार : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्या जागेवरील काही मूळ मालकांचे प्लॉट हडप केल्याचा आरोप जमीन मालकांनी केला आहे. गट नंबर 92 प्लॉट नंबर 85 या ठिकाणी असलेला 1385 स्क्वेअर फुट जागा अप्पाराव गोराडे यांच्या नावावर आहे. मागच्या पंधरा वर्षापासून त्यांनी आपल्या प्लॉटचा कर नगरपालिकेला भरला आहे. गोराडे यांचा मुलगा योगेश गोराडे हा भारतीय सैन्यात आहे. भारतीय सैन्यात असलेल्या योगेश गोराडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले देऊन तक्रार दिली. मात्र अद्याप त्या पत्राची साधी दखलही घेण्यात आलेली नाही, 4 महिन्यांपासून कारवाई कधी होणार या प्रतीक्षेत गोराडे कुटुंबीय आहे.
महाविद्यालयासाठी जमीनीवर कब्जा? : सिल्लोड आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जात आहे, त्यासाठी जमीन घेण्यात आली होती. मात्र त्याच्या बाजूला असलेल्या जमिनी देखील घेण्यात येत आहेत. त्या गट क्रमांक मधील काही लोकांनी सत्तार यांच्या संस्थेला बक्षीस पत्र करून दिले, तरी काही जणांनी मात्र अद्याप आपली जमीन दिलेली नाही, त्यांची जमीन सत्तार यांच्या आदेशाने बळकवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. जमिनीचा सातबारा, रजिस्ट्री आणि मागील 15 वर्षापासून भरत असलेल्या कराच्या पावत्या आहेत. तरी देखील दिलेल्या तक्रारी बाबत कोणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोप तक्रारदारांनी केली आहे.
सत्तार यांनी फेटाळले आरोप :या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी आरोप फेटाळले आहेत. असे काही झाले नसून सदरील जमीन अनधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत सखोल चौकशी करावी, तरी याबाबत आम्ही चुकीचे असेल तर आमच्यावर आणि कृषी मंत्री चुकीचे असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी भूमिका जमीन मालक गजानन गोराडे कुटबियांनी स्पष्ट केली. आम्ही एकटे नाही तर अश्या अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप भारतीय सैन्यात भरती असलेल्या योगेश गोराडे यांचे भाऊ गजानन गोराडे यांनी केला.
हेही वाचा -
- Abdul Sattar on Sanjay Raut त्या महाकुत्र्याला राज्यसभेवर आम्हीच पाठवलं अब्दुल सत्तारांची जीभ घसरली
- Gayran Land Case नियमानुसारच गायरान जमीन वाटप अब्दुल सत्तार यांचा विधानसभेत दावा