औरंगाबाद- गॅसवर चहा करताना भडका उडून घराला आग लागल्याची घटना पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथे घडली. या आगीत घरातील लाखो किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना बुधवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
चहा बनवताना गॅसचा भडका; शेतकऱ्यांचे संपूर्ण घर जळून खाक
पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवाशी मधुकर कचरू मगरे आपल्या परिवारासोबत शिवारातील शेतामध्ये राहतात. ते बुधवारी शेतातील कामे उरकून घरी आले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना चहासाठी विचारणा केली. त्यावर त्यांनी होकार देताच पत्नीने गॅसवर चहा ठेवताना, अचानक गॅसचा भडका उडाला आणि कुडाला आग लागली.

ही आग भडकत गेली. तेव्हा मधुकर आणि त्यांच्या पत्नी घराबाहेर आले. तेव्हा अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आधीच दुष्काळाने शेतकरी कुटुंब हैरान झालेले आहे. त्याचच ही आग लागल्याने त्यांच्या संकटात वाढ झाली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.