छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : G20 Summit : दिल्ली इथं जी २० अंतर्गत महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. यात कोल्हापूरची चप्पल (Kolhapuri Chappal) आणि जिल्ह्याची जागतिक ओळख असलेली पैठणी (Aurangabad Paithani) यांचं ब्रँडिंग केली जाणार आहे. याचा थेट परिणाम सकारात्मक प्रसिद्धी आणि व्यवसायावर होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या जी २० परिषदेत देखील पैठणी मुख्य आकर्षण म्हणून ठेवण्यात आली होती. वीस देशांच्या पाहुण्यांना हिमरू शालसह पैठणीचा फेटा (Paithani Saree Pheta) घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं.
पैठणीचं महत्त्व पुरातन काळापासून :(Importance of Paithani Saree) पुरातन काळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती, असं मानलं जातं. पदरावर मोराची प्रामुख्याने चौकोनी वैशिष्ट्यपूर्ण नक्षी असलेली पैठणी ही शिवकालीन साडी आहे. जगप्रसिद्ध पैठणीचं महत्त्व जुन्या काळापासून मानलं जाते. पैठण तालुक्यात हातमागावर तयार झालेले वस्त्र म्हणजे पैठणी. एक वस्त्र तयार करण्यासाठी एका कारागिरीला अनेक महिने मेहनत घ्यावी लागते. धागा धागा यंत्रावर जोडून हे वस्त्र तयार केलं जाते. याला रेशमी वस्त्र म्हणून देखील ओळखलं जाते. पैठणीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नक्षीकाम हात मागावर एक एक धागा घेऊन तयार केलेलं वस्त्र असलं तरी, त्यातलं नक्षीकाम सर्वांना आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचं. पैठणी घेणं हे प्रत्येक सौभाग्यवतीचं स्वप्न असायचं. पण ते घेणं प्रत्येकाच्या आवाक्यात बसत नव्हतं. हे वस्त्र वापरणारी स्त्री म्हणजे उच्चभ्रू किंवा राजेशाही कुटुंबातील म्हणून ओळखलं जायची. काळपरत्वे या वस्त्रात अनेक बदल घडत गेले, त्यात मिनी पैठणी हा प्रकार समोर आला. त्यामुळे अनेकांच्या आवाक्यात हे वस्त्र येऊ लागलं. जगात कुठे नाही, असं महावस्त्र फक्त महाराष्ट्रातच तयार होतं. याच वस्त्राची ब्रँडिंग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाणार आहे.