महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक-वैजापूर महामार्गावर चारचाकी -कंटेनरचा भीषण अपघात, चार ठार - अपघात

मुंबईहून परत येताना नाशिक-वैजापूर महामार्गावर झाला अपघात.

नाशिक-वैजापूर महामार्गावर चारचाकी -कंटेनरचा भीषण अपघात, चार ठार

By

Published : Feb 26, 2019, 11:58 AM IST

औरंगाबाद -नाशिक-वैजापूर महामार्गावर चारचाकी आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद येथील मदन ढाकणे, दिनेश बकाल, विलास घुले आणि सविता घुले यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मदन ढाकने यांच्या पत्नी अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुकुंदवाडी येथे राहणारे मदन ढाकणे त्यांच्या पत्नी, दिनेश बकाल, विलास घुले आणि त्यांच्या पत्नी सविता हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. काम झाल्यानंतर मुंबईहून परत येताना नाशिक-वैजापूर महामार्गावर कंटेनरचा टायर फुटल्याने कंटेनर रस्त्यावर आडवा झाला आणि समोरून येणारी गाडी या कंटेनरला धडकली. अपघात एवढा भीषण होता, की या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details