औरंगाबाद - शहरात कोरोनाचे नव्याने चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. यामध्ये कोरोनाबाबत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच लागण झाल्याचे समोर आले आहे.
CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचे चार नवे रुग्ण, संख्या 24 वर.. - सारी
शहरातील किरडापुरा भागात दोन, आरेफ कॉलनीतील एक आणि देवळाई परिसरात एक असे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले निकटवर्तीय बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरातील किरडापुरा भागात दोन, आरेफ कॉलनीतील एक आणि देवळाई परिसरात एक असे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांनाच बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, नव्याने लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही आता शोध घेतला जात आहे.
नव्याने लागण झालेल्या रुग्णांमध्ये किराडपुरा भागातील अकरा वर्षीय मुलगी आणि तिच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाली असून आरेफ कॉलनीतील एक ७० वर्षीय पुरुष आणि देवळाईतील एका ३० वर्षीय महिलेलाही लागण झाली आहे. औरंगाबादेत रुग्णसंख्येचा आता आकडा 24 वर पोहोचला आहे. त्यात एका रुग्णाचा बळी गेला असून एक रुग्ण उपचार घेऊन घरी गेला आहे. तर, कोरोनाबरोबरच सारीचा प्रादुर्भावदेखील वाढत असून सारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13 वर गेली आहे.