औरंगाबाद - जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अचानक आग लागली. या आगीत ४ झोपड्या आणि चार जनावरांसह गृहउपयोगी साहित्य जाळून खाक झाले. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गराडा येथे घडली.
कन्नड तालुक्यात चार घरांना भीषण आग - goods
घराला लागलेल्या भीषण आगीत चार जणावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत घरातील संसार साहित्य, शेती अवजारेही जळून खाक झाली आहेत.
या आगीत भरत रायसिंग राठोड, सरिचंद हिरा राठोड, ब्रह्मदेव नामदेव राठोड, आनंदा गलचंद राठोड यांची घरे जळून खाक झाली आहेत. घराला लागलेल्या भीषण आगीत चार जणावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत घरातील संसार साहित्य, शेती अवजारेही जळून खाक झाली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच तलाठी विकास वाघ यांनी प्रथम नगरपरिषद व बारामती अॅग्रोची आग्निशामक दलाची गाडी बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेचा पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. यातील ब्रह्मदेव नामदेव राठोड यांच्या घरी १९ मे रोजी लग्न होते. या आगीत लग्नसाठी खरेदी केलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून आगीचे कारण अस्पष्ट आहे.