औरंगाबाद- बकऱ्यांना चारा घेऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या चार अल्पवयीन मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये बकऱ्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचे अपहरण - अपहरण
शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चारही मुले बकऱ्यांना चारा घेऊन येतो असे सांगून घरातून गेले होते. रात्र झाली तरीही चौघे परतले नसल्याने आई-वडिलांनी परिसरात व नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.
बाडू संतोष मोरे (वय-12), समाधान भानुदास सोनवणे (वय-11), विक्रम भानुदास सोनवणे (वय-10), विलास सखाराम सोनवणे (वय-15) असे अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. ते चारही मुले भादली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते.
शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चारही मुले बकऱ्यांना चारा घेऊन येतो असे सांगून घरातून गेले होते. रात्र झाली तरीही चौघे परतले नसल्याने आई-वडिलांनी परिसरात व नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी सोमवारी रात्री पालकांनी शिऊर पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार नोंदवली. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे करत आहेत.