महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Former MLA Bhausaheb Patil Chichtgaonkar : राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हे केले आरोप

काल मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर औरंगाबादच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (Former MLA Bhausaheb Patil Chichtgaonkar) यांनी आमदार सतिश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले (Chichtgaonkar allegations against Satish Chavan) आहे.

ठोंबरेंना राष्ट्रवादीत आणण्यामागे आ. सतीश चव्हाण
ठोंबरेंना राष्ट्रवादीत आणण्यामागे आ. सतीश चव्हाण

By

Published : Nov 17, 2022, 9:01 AM IST

Updated : Nov 17, 2022, 12:50 PM IST

औरंगाबाद :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत काल मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर औरंगाबादच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. कारण वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (Former MLA Bhausaheb Patil Chichtgaonkar) यांनी आमदार सतिश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले (Chichtgaonkar allegations against Satish Chavan) आहेत.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात सतीश चव्हाण एक गट तयार करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत असतात. तर औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आमदार कसा निवडून येणार नाही, यासाठी देखील सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केला आहे. वैजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार भाऊसाहेब चिगटगांवकर राष्ट्रवादी कॉग्रेस

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे काम :यावेळी बोलताना चिकटगावकर म्हणाले की, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्याठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी पक्षात वेगळा गट तयार करण्याचे काम आमदार चव्हाण करतात. त्यानंतर निवडणूक लागताच त्या गटाला विरोधी पक्षात पाठवून आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे काम चव्हाण यांच्याकडून सुरू आहे. वैजापूर येथील काँग्रेसच्या ठोंबरे गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला मी विरोध करून देखील त्यांना अजित पवारांच्या उपस्थितीत काल प्रवेश देण्यात आल्याचे म्हणत चिकटगावकर यांनी नाराजी व्यक्त (Vaijapur press conference) केली.

पर्याय खुले :तालुक्यातील कार्यकर्त्यांची गावागावात जाऊन मी भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या पक्षात जायचे किंवा राष्ट्रवादी थांबायचे. याबाबत मी निर्णय घेणार असल्याचे सुद्धा चिकटगावकर यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे शिंदे गट सोडून सर्वच पक्षाचे माझ्यासाठी पर्याय खुले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट बोलून दाखवले. त्यामुळे आगामी काळात चिकटगावकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास नवल वाटू (allegations against MLA Satish Chavan in Vaijapur) नये.

Last Updated : Nov 17, 2022, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details