औरंगाबाद - पुलवामा येथील घटनेचा हा बदला आहे, असे मत माजी लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ढगे यांनी हे मत मांडले.
पाकिस्तानवरील हल्ल्याचे माजी लष्करी अधिकाऱ्यांकडून समर्थन
पुलवामा येथील घटनेचा हा बदला आहे. उरी नंतर झालेले सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य नव्हते. त्यामुळे एअरफोर्सने आपले काम केले. या हल्ल्याने पाकिस्तानला उत्तर दिले आहे, असे मत माजी लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानने या हल्ल्यात जास्त नुकसान झाले नाही, असा दावा केला आहे. पाकिस्तानने हा हल्ला मान्य केला तर त्यांचा नाकर्तेपणा समोर येईल त्यामुळे आता पाकिस्तान हल्ला मान्य करणार नाही, असेही ढगे यावेळी म्हणाले.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात देशाचे ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले होते. यामुळे या हल्ल्यानंतर भारत काहीतरी पाऊल उचलणार हे दिसून येत होते. यावेळी उरी नंतर झालेले सर्जिकल स्ट्राईक करणे शक्य नव्हते. त्यामुळे एअरफोर्स ने आपले काम केले. या हल्ल्याने पाकिस्तानला उत्तर दिले असल्याचे ढगे यांनी सांगितले. अमेरिकेने लादेनला मारले त्यावेळी पाकिस्तानने काहीच झाले नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानला मान्य करणे इतके सोपे नसल्याचे मत ढगे यांनी व्यक्त केले.