महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णाला भेटण्यापूर्वी हात न धूता गेल्यास वाजतो अलार्म ; 'या' रुग्णालयात संसर्ग होवू नये म्हणून खास दक्षता - MGM

मराठवाड्यातील अत्याधुनिक असणारे आयसीयू शहरातील एमजीएम रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील पहिलं अत्याधुनिक आयसीयू औरंगाबादेत..

By

Published : Jun 15, 2019, 12:34 AM IST

औरंगाबाद - रुग्णालयात संसर्ग होवू नये म्हणून काळजी घेणारे शहरात एमजीएम रुग्णालय सुरू झाले आहे. आजारी रुग्णांना किंवा नातेवाईकांना संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णालयात खास दक्षता घेण्यात आल्या आहेत.


मराठवाडा, खानदेश, विदर्भातील काही जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या आजारांच्या उपचारांसाठी मुंबई मध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागते. त्यामुळे मोठ्या खर्चाचा डोंगर रुग्णांच्या कुटुंबियांवर पडतो. औरंगाबादेत मराठवाड्यातील सर्वात अत्याधुनिक आयसीयू एमजीएम रुग्णालयात सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

अत्याधुनिक आयसीयू मध्ये जाताना त्या खोलीच्या बाहेर अलार्म लावण्यात आला आहे. डॉक्टर किंवा रुग्णांचे नातेवाईक हात न धुता केबिनमध्ये गेले तर तो अलार्म वाजतो आणि सावध करतो. पॉजिटीव्ह व्हेवस आणि निगेटिव्ह व्हेवस अश्या दोन प्रकारच्या आयसीयू तयार करण्यात आल्या आहेत. निगेटिव्ह व्हेवस या खोलीत स्वाईन फ्ल्यूसारख्या आजाराचे रुग्ण असणार आहेत. या खोलीत निगेटिव्ह व्हेवस खोलीत न राहता बाहेर जातात, त्यामुळे त्या खोलीत येणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

मराठवाड्यातील अत्याधुनिक आयसीयू औरंगाबादेत..

अतिगंभीर आजार असणाऱ्या रुग्णासाठी या सुविधा असणार आहेत. या विभागात रुग्णांच्या नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव असणार असून फक्त दोन जणांनाच दिवसभरातून एक वेळा रुग्णांना भेटता येणार आहे. त्यामुळे आजाराचा प्रसार होणार नाही, अशी माहिती एमजीएम प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details