औरंगाबाद - कोरोना व्हायरस मुळे देशात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांचा लहान मुलांवर परिणाम होताना दिसत आहे. औरंगाबादेत एका कुटुंबातील चिमुकल्यांनी कोरोनाच्या भीतीने शाळेला दांडी मारल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादचे परिचित असलेले डॉक्टर शोएब हाश्मी त्यांच्या भावांसह एकत्रित कुटुंबात कटकटगेट परिसरात राहतात. यांच्या कुटुंबातील सर्व मुलांनी एक दिवस चक्क शाळेला दांडी मारली. डॉक्टर शोएब यांना कळाल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना बोलावून शाळेत न जाण्याचे कारण विचारले. त्यावेळी कोरोना व्हायरस होण्याची भीती वाटत असल्याने आपण शाळेत गेलो नसल्याचे मुलांनी सांगितलं. त्यावेळी डॉ. शोएब हाश्मी यांनी कोरोना बाबत मुलांना इतके कुठून कळले असा प्रश्न पडला.
यानंतर मुलांनी वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बाहेर पडल्यावर होणाऱ्या चर्चेतून त्यांना कोरोना बाबत माहिती मिळाल्याचे सांगितले.