औरंगाबाद - मुलाच्या लग्नाच्या दिवशी वडीलांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील बोरगाव येथे घडली. वडीलांचे पार्थिव घरात असताना तालुक्यातील बोकुडजळगाव येथे मोजक्या नातेवाईकांसमक्ष लग्न करण्याची वेळ या तरुणांवर आल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नाच्या दिवशीच वरपित्याचा ह्रदयविकाराने मृत्यू - sachin jire
औरंगाबाद - मुलाच्या लग्नाच्या दिवशी वडीलांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील बोरगाव येथे घडली
पैठण तालुक्यातील बोरगाव येथील ईश्वर बोबडे या तरुणांचे आज तालुक्यातीलच बोकुडजळगाव येथे विवाह सोहळा पार पडणार होता. या सोहळ्यासाठी बहिणी, नातेवाईक घरी जमले होते. लगीनघाई सुरू असताना सकाळी ईश्वरचे वडील लक्ष्मण देवराव बोबडे यांनी सकाळी गावात जाऊन रोजच्या प्रमाणे मारुतीचे दर्शन घेतले आणि घरी आले. त्यानंतर अचानक त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. घरात सर्वत्र आनंद व ऊत्साहाचे वातावरण असताना अचानक या घटनेने घरात स्मशानशांतता पसरली. या दु:खातून सावरत नातेवाईकांनी काही पाहुण्यांना सोबत नेऊन बोकुडजळगाव येथे ईश्वरचा विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर मुलाने गावात येऊन आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे बोरगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.