महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वतःच्या अल्पवयीन मुलासह चोऱ्या करणारा बाप जेरबंद, 6 लाखांचा ऐवज जप्त

स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोऱ्या करणाऱ्या बापाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरट्या बापासह पोलीस पथक

By

Published : Nov 25, 2019, 8:12 AM IST

औरंगाबाद- अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या बापाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले आहे. रंगनाथ सुब्रहमण्यम कस्तुरे असे मुलाच्या मदतीने चोऱ्या करणाऱ्या बापाचे नाव असून त्यांच्या ताब्यातून 6 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आरोपी रंगनाथ कस्तुरे हा आपल्या १५ वर्षीय मुलाच्या मदतीने घरफोड्या करत होता. रंगनाथ कस्तूरे याने कातपूर शिवारातील रहिवासी मुकुंद शांताराम जोशी यांच्या घरी चोरी करून ३ लाख ७० हजार ५५० रूपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. चोरीचा माल विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, जमादार संजय काळे, प्रमोद खांदेभराड, राहुल पगारे आदींच्या पथकाने सापळा रचून कस्तूरे याला अटक करत त्याच्याकडून ६ लाख १८ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा - औरंगाबाद-सोलापूर मार्गावर दोन ट्रकची धडक; दोन किरकोळ जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details