महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 25 झाडे लावण्याची सक्ती; कृषी विभागाचा निर्णय - 25 trees

33 कोटी वृक्ष लागवडीचा ध्येय पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात कृषी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना आता त्यांच्या शेतामध्ये 25 झाडे लावण्याची सक्ती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

कृषी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 25 झाडे लावण्याची सक्ती

By

Published : Jul 31, 2019, 2:43 PM IST

औरंगाबाद- येथे 33 कोटी वृक्ष लागवडीचा ध्येय पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात कृषी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता त्यांच्या शेतामध्ये 25 झाडे लावण्याची सक्ती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

कृषी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 25 झाडे लावण्याची सक्ती
जिल्हा परिषदे मार्फत कृषी योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थीना आता त्यांच्या शेतात 25 झाडांची लागवड करणे सक्तीचे करण्यात आले. यात मागील तीन वर्षांतले सुमारे 1 हजार लाभार्थी आहेत. यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 10 हजार पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन होईल. यामुळे 33 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनाला मदत होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details