औरंगाबाद - फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक होत बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला. दुष्काळात फळबागांचे नुकसान झाले असून, बँक मात्र पीकविमा देण्यास टाळाटाळ करत असल्याने घेराव घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पिकविम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांचा बँक अधिकाऱ्यांना घेराव - bank
फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक होत बँक अधिकाऱ्यांना घेराव घातला. दुष्काळात फळबागांचे नुकसान झाले आहे.
गेल्या २ महिने पिकविम्याबाबत बँकेकडे पाठपुरावा करत असून, बँक समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दुष्काळी परिस्थिती पिकांचे नुकसान झाले आहे. पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात आली मात्र, आता विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जात नाही. शेतकऱ्यांना हवामानावर आधारीक विमा काढण्याचे काम एसबीआय बँकेला देण्यात आले होते. शेती मालाची आणि फळबागांची अवस्था बिकट झाली असताना फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देताना बँक टाळाटाळ करत आहे.
बँकेचे मुख्य कार्यालय पुण्यात असल्याने बँकेचे स्थानिक अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. बँकेच्या या कारभाराच्या विरोधात अन्नदाता शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. रविवारपर्यंत शेतकऱ्यांना फळबाग विमा मिळाला नाही तर सोमवारपासून पुण्यातील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढू असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.