महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

suicide cases : ऐन दिवाळीत नापिकी कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्याची आत्महत्या; शेतातच संपवलं जीवन

suicide cases : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबताना दिसत नाही. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आता टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. सलग नशिबी आलेली नापिक, यातून वाढत जाणाऱ्या कर्जाला कंटाळून, गंगापूर तालुक्यातील सावंगी येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे.

suicide cases
शेतकऱ्याची आत्महत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 6:43 PM IST

छत्रपती संभाजीनगर (गंगापूर)suicide cases : गंगापूर तालुक्यातील सावंगी येथील अल्पभूधारक शेतकरी हा दिवाळीनिमित्त (Diwali 2023) मुलांना कपडे तसंच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला. परंतु तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी शोध घेतला असता त्यांचा लासुर स्टेशन जवळील एका शेतात मृतदेह आढळून आला. गणेश पवार वय वर्ष 38 राहणार सावंगी असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सगळीकडे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, ऐन दिवाळीच्या दिवशी एका ३८ वर्षीय शेतकऱ्यानं नापिकी, कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



काही दिवसापासून नापिकी कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात: शेतकरी गणेश पवार यांच्यावर बँकेचं कर्ज होतं. मागील चार वर्षांपासून सतत अतिवृष्टी आणि यंदा कोरडा दुष्काळ असल्यानं उत्पन्न अल्प प्रमाणात झाले. त्यात घर खर्च भागवायचा की कर्ज फेडायचं याची चिंता गणेश पवार यांना सतत होती. त्यामुळं ते नेहमी तणावाखाली असायचे. दरम्यान, शुक्रवारी गणेश यांनी जेवणही केलं नाही. दिवाळी सारखा सण असल्यानं खरेदी कशी करायची या मनःस्थितीत शनिवार (11 नोव्हेंबर) रोजी पवार घरातून निघून गेले आणि सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यामुळं नातेवाईकांनी पवार यांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते सापडले नाहीत. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली.


घरी परत न आल्याने नातेवाईकांनी घेतला शोध : रात्र झाली तरीही गणेश परत आले नाहीत. त्यामुळं नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान त्यांचा मृतदेह लासूर स्टेशन शिवारातील एका शेतात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन चिमुकल्या मुली आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details