महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी पुन्हा आशावादी, मात्र भांडवल नसल्याने विवंचनेत - marathwada droughts

औरंगाबाद जिल्ह्यात मान्सून पूर्व दोन मोठे पाऊस झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भांडवल नसल्याने शेती करावी कशी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पेरणीच्या तयारीला लागलेले शेतकरी

By

Published : Jun 11, 2019, 11:05 PM IST

औरंगाबाद- दुष्काळाचा सामना करणारा मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, नव्या जोमाने शेती करायला अनंत अडचणी असल्याने शेती व्यवसाय करावा कसा, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. आधीचेच कर्ज चुकते केले नसल्याने बँक नव्याने कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विवंचनेत वाढ झाली आहे.

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाने यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची घेतलेला आढावा

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी औरंगाबाद 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने पळशी गावातील कचरू पळसकर या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आढावा घेतला. शेतकऱयांपुढे अडचणींचा डोंगर उभे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खते, बी-बियाणे आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशाही परिस्थितीत शेतकरी शेतात राबत आहेत.

कचरू पळसकर यांना दोन एकर शेती आहे. मागील दोन वर्षांच्या दुष्काळामुळे त्यांची शेती तोट्यात आहे. घरात पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत काही पिकत नसल्याने दोन वर्षांपासून कचरू दुष्काळाच्या झळा भोगत आहेत. दोन वर्षात शेतीत काहीही न उगल्याने बँकेचे एक लाखांचे कर्ज थकीत आहे. आता पाऊस चांगला होईल, असा विश्वास त्यांना आहे. मात्र, नव्या जोमाने शेती करायला आता पैशांची गरज असताना थकबाकीदारांमध्ये नाव आल्याने बँक कर्ज देणार नसल्याने यावर्षी पेरणी कशी करावी, असा प्रश्न कचरू पळसकर यांना पडला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मान्सून पूर्व दोन मोठे पाऊस झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भांडवल नसल्याने शेती करावी कशी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यातच मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि आरोग्य याचा खर्च कर्ज काढुन भागवण्याची वेळ आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details