औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने येथील शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. पंडित पांडुरंग गोंगे (वय 30 रा. सावखेडा) असे वाहून गेलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा शेतकरी वाहून जात असताना त्याला कोणीही वाचविण्यासाठी प्रयत्न केला नाही. उलट त्याचा व्हिडिओ काढण्यात तेथील काहीजण व्यस्त होते.
VIDEO : पुराच्या पाण्यातून जाणे बेतले जिवावर, शेतकरी गेला वाहून हेही वाचा -विधानसभा निवडणूक : राज्यात २ हजार ७४७ मतदान केंद्र संवेदशील
बुधवारी सिल्लोड-सोयगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने खेळणा आणि पूर्णा नदीला पूर आला होता. पंडित पांडू गोंगे हा युवक सावखेडा गावात मेडिकल स्टोअर नसल्याने आईसाठी लागणारी औषधे घेण्यासाठी सावखेडा येथून बोरगाव बाजार येथे पाई जात होता. त्यातच रस्त्यावरून जाणाऱ्या पूर्णा नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जावून पूर्णा नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला.
हेही वाचा -तरबेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणाला नवे वळण; तरबेजचा मृत्यू मारहाणीमुळेच
रस्त्यावरून वाहून जाताना लोकांनी त्याला पाहिले पण कुणी ही त्याची मदत केली नाही. उलट सर्व जण व्हिडिओ करण्यात मग्न होते. वेळेवर त्याची कुणी मदत केली असती तर कदाचित पाण्यात वाहून जाताना त्यांना वाचवता आले असते. मात्र, तसे झाले नाही आणि बघता बघता पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हेही वाचा -जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार विकास आडे, कर्मचारी मुश्ताक शेख, दीपक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने आणि पुराचे पाणी वाढत जात असल्याने शोध घेणे अवघड झाले आहे. तर पूर कमी झाल्यावर त्याचा शोध लागेल अशी शक्यता आहे.