औरंगाबाद - सावकारी कर्ज आणि नापिकीला कंटाळून एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. योगेश कचरू वाघ (रा. चौका, फुलंब्री) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
सावकारी कर्ज आणि नापिकीला कंटाळून 28 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या - farmer committed suicide
सावकारी कर्ज आणि नापिकीला कंटाळून एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. योगेश कचरू वाघ (रा. चौका, फुलंब्री) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मृत योगेशला एक दीड वर्षांची मुलगी आहे. पत्नी आणि मुलगी दोन्ही दिवाळीनिमित्त माहेरी गेले होते. योगेशला गावातच सुमारे अर्धा एकर जमीन आहे. त्यात त्याने तुरीची लागवड केली होती. मात्र, अस्मानी संकटामुळे तुरीच्या पीकाचे होत्याचे न्हवते झाले. यासाठी योगेशने खासगी सावकाराकडून सुमारे 1 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आज सकाळी योगेश झोपेतून न उठल्याने घरच्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्याने नायलॉन दोरीने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
TAGGED:
farmer committed suicide