औरंगाबाद - मराठवड्यात यावेळी पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरवर्षी दुष्काळाने होरपळणारा शेतकरी यंदा अतिवृष्टीमुळे त्रस्त झाला आहे. मराठवाड्यातील कापूस, मका, सोयाबीनसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा सरकारपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे.
ईटीव्ही भारत विशेष : यंदा दुष्काळामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत
दरवर्षी मराठवाड्यात वर्षभरात 22 ते 25 दिवस पावसाचे असतात. मात्र, यावर्षी जवळपास 74 दिवस पाऊस पडला. एकट्या संप्टेंबर महिन्यात 22 दिवस पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दरवर्षी 700 मिलिमीटर पाऊस होतो मात्र यावर्षी 924 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 158 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात यावर्षी पावसाची संततधार पाहायला मिळाली. त्यामुळे 11 धारणांपैकी 10 धरणे ओसंडून वाहत आहेत. त्यात जायकवाडी धरणातून गेल्या महिनाभरांपासून पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे. नदीवरील 11 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडीसह निम्न दुधना, येलदरी धरण, सिद्धेश्वर, माजलगाव, वैनगंगा, मनार, विष्णुपुरी, सिना - कोळेगाव ही धरणं 100 टक्के भरली आहेत. मराठवाड्यात फक्त लातूरचे मांजरा धरण 55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदा मिटणार आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळणार असला तरी अती पावसामुळे शेत मालाचे मात्र नुकसान झाले आहे.
दरवर्षी मराठवाड्यात वर्षभरात 22 ते 25 दिवस पावसाचे असतात. मात्र, यावर्षी जवळपास 74 दिवस पाऊस पडला. एकट्या संप्टेंबर महिन्यात 22 दिवस पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दरवर्षी 700 मिलिमीटर पाऊस होतो. मात्र यावर्षी 924 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 158 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.