औरंगाबाद - सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अद्यापही सर्व ठिकाणचे उमेदवार जाहीर करताना दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नसल्याने ते मिळेल त्याला तिकिट देतील, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. तसेच एकनाथ खडसे नाराज नसून, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर होणार असल्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली.
एकनाथ खडसे नाराज नाहीत, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव येईल - दानवे - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
एकनाथ खडसे नाराज नसून, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर होणार असल्याची शक्यता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
एकनाथ खडसे नाराज नाहीत. पहिल्या यादीत नाव आले नसले तरी पुढील दोन दिवसात जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असू शकते असा अंदाज दानवेंनी व्यक्त केला. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी दानवे बोलत होते. एकेकाळी दोन खासदार असणारा पक्ष आता मोठा झाला आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीचे दररोज कोणीतरी राजीनामा देत आहेत. पक्षातील निष्ठावंतांना न्याय देणार असल्याचेही दानवे म्हणाले. सर्वात जुना असलेला पक्ष काही वर्षात संपेल असे वाटत असल्याचे दानवे म्हणाले. तिकीट वाटपवरून काही जण नाराज होतील मात्र बंडखोरी कोणीही करणार नाही, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.