औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथे निघत असलेल्या आळ्यांमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्या आळ्यांमुळे कुठलाही धोका नसून सेंद्रिय जागेतच त्या निघत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
गंगापूर तालुक्यात निघालेल्या 'त्या' आळीमुळे घाबरण्याचे कारण नाही - अभ्यासक - गंगापूर
जमिनीतून निघत असलेल्या पांढऱ्या आळीमुळे गावकरी भयभीत झाले होते. गावातील प्रकार जाणून घेण्यासाठी कीटक तज्ज्ञ ऐन. आर. पतंगे यांनी गावाला भेट दिली. आळीची पाहणी केली असता घाबरण्याचे काम नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावात जमिनीतून निघणाऱ्या पांढऱ्या आळीमुळे गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. मात्र, यात भीतीचे काही कारण नाही, ही आळी दिसत असली तरी ही कोणतीही हानी करणार नाही. सेंद्रिय जागेवर या आळ्या येत असून औरंगाबादच्या गंगापूरसह सिल्लोड भागात अश्या आळ्या दिसून येत आहेत. या जास्तीतजास्त पिकांच्या मुळाशी बसतील, त्या व्यतिरिक्त त्या काही हानी पोहचवणार नाही, असे स्पष्टीकरण तज्ञांनी दिले आहे. तज्ञांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.