औरंगाबाद -'ही बायको पुन्हा नको रे बाबा' असं म्हणत पत्नी पीडित पुरुषाने पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षणा घातल्या आहेत. वट सावित्रीला प्रत्येक सुहासिनी हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या घालतात. मात्र, पत्नी पीडित संघटना याला विरोध करत एक दिवस आधी पिंपळाच्या झाडाची पूजा करुन 'सात जन्म काय सात सेकंद देखील ही बायको नको', अस साकड देवाकडे मागत आहेत.
ही पत्नी नको -पत्नी पीडित संघटना नेहमीच बायकोपासून छळ होणाऱ्या पुरुषांच्या बाजूने लढा उभारते. महिला वट सवित्री पौर्णिमेला वडाची पूजा करतात. मात्र, काही महिलांना हा अधिकार नसल्याच पत्नी पीडित पुरुष संघटनेचे भारत फुलारी यांनी सांगितले. वाडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी मनोकमाना महिला करतात. मात्र, काही पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महिलांकडून मिळणारी वागणूक चुकीची असते. अशा महिलांसोबत राहण्याची इच्छा पुरुषांची नसते. त्यांच्या बायकोची विनंती ऐकण्याआधी पुरुषांची विनंती ऐकून अशा पत्नी पासून दूर ठेव, अशी विनंती पिंपळाच्या झाडाला केली जाते. पिंपळाचे झाड मुंजा म्हणजेच अविवाहित मानले जाते. त्यामुळे या झाडाच पूजन करून बायको नको आम्हाला पण मुंजा म्हणजेच अविवाहित ठेव अशी मनोकामना व्यक्त केली जाते.
महिलांचे कायदे काही वेळा घातक -काही वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या. त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे तयार केले गेले. मात्र त्या कायद्यांचा आधार घेऊन सासरच्या मंडळींवर खोटे आरोप करत तुरुंगवास घडवला. स्त्री पुरुष समानता करता करता स्त्रीनेच केव्हा पुरुषांना गुलाम बनवले हे कळाले नाही. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटला परंतु ह्या एकतर्फी कायद्यामुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला आहे. आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी संघटना काम करत असल्याच पत्नी पीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारी यांनी सांगितलं.
पुरुषांना कायद्यांचे संरक्षण द्या -भारतीय संविधानात आर्टिकल 14,नुसार कायद्यासमोर समानता अस्ताने समानता राहिली नाही. कायदा स्त्री व पुरुष असा भेदभाव करत आहे. आर्टिकल 21 नुसार पुरुषांना देखील जगण्याचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु आज एकतर्फी कायद्याने पुरुषांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे . बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहे. NCRB अहवालावरून हे स्पष्ट होते. त्यामुळे लिंग भेद न करता कायदे बनल्या गेले पाहिजे, तसेच पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे. सद्यस्थितीमध्ये स्त्रियांच्या बाजूने असलेल्या भरमसाठ कायद्याचा आधार घेत स्त्रियांनी फक्त स्वतःची प्रगतीच केली नाही. तर पुरुषांना गुलाम बनवण्यासाठी त्या कायद्याचा गैरवापर करणे सुरू केला. याचा परिणाम विवाह पद्धतीवर होऊन विवाह बंधन हे एक पवित्र बंधन अस्ताने त्याचे रूपांतर व्यवसायात होत चालले आहे. एकत्र कुटुंब बद्धत बुडाली असून विवाहवरचा युवकांचा विश्वास उडत जाऊन भारत पाश्चात्य संस्कृतीचे अवलंब करताना दिसत आहे. ही बाब अतिशय हानिकारक आहे. असा आरोप पत्नी पीडित पुरुष संघटनेने केला आहे.
महिलांचं ऐकू नको म्हणून पूजा -वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला मुन्जाला साकडे घातले कि 'हे मुंजा हे यमराजा उद्या आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील, त्यामुळे त्यांचे काही एक आयकू नकोस अश्या बायकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा तुझाच सहारा चांगला ' त्यामुळे त्यांचे काही ऐकू नको. अश्या भांडखोर बायका आम्हाला सात जन्म तर काय पण सात सेकंद देखील नको. असे म्हणून सोमवारी पत्नी पीडितांनी वाळूज येथील 'पत्नी पिडीत पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली. यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष एड.भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मणाळ, चरणसिंह गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड, बनकर,नाटकर, कांबळे आदि पत्नी पिडीत व सह पिडीत मोठ्या संखेने उपस्थित होते.
हेही वाचा -Santosh Jadhav Arrest : संतोष जाधव अटक प्रकरणी एडीजी कुलवंत सरंगल यांची पत्रकार परिषद, म्हणाले...