महाराष्ट्र

maharashtra

कोरोना रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच नाही

By

Published : Mar 5, 2021, 1:33 PM IST

कोरोना झालेल्या रुग्णास औरंगाबाद येथे रुग्ण्यालयात जाण्यासाठी सहा तास रुग्णवाहिका मिळाली नसल्याचे धक्कादायक चित्र सिल्लोड येथे पहावयास मिळाले आहे

Aurangabad
रुग्णवाहिका

सिल्लोड (औरंगाबाद)- कोरोना झालेल्या रुग्णास औरंगाबाद येथे रुग्ण्यालयात जाण्यासाठी सहा तास रुग्णवाहिका मिळाली नसल्याचे धक्कादायक चित्र सिल्लोड येथे पहावयास मिळाले आहे. वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही त्यामुळे सदरील कोरोना संसर्ग झालेला रुग्ण सरळ उपजिल्हा रुग्णालयात आल्याने अन्य रुग्ण व आरोग्य कर्मचार्याना संसर्गाचा धोका निर्माण झाला होता.रुग्णवाहिका मिळत नसल्याने हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अमित सरदेसाई यांनी तर हतबलता व्यक्त केली. आता आपले कसे होणार यामुळे रुग्णाची तर पोझीटीव रुग्ण रुग्णालयात असल्या ने संसर्गाच्या भीतीने अन्य रुग्ण, नातेवाईक, आरोग्य कर्मचारी याची भीतीने गाळण उडाली होती. अंधारी प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत गावात कोरोना संसर्ग झालेला रुग्ण असल्याने त्याला उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु सिल्लोड येथील कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने त्याला औरंगाबाद येथे घाटीत उपचारासाठी दाखल करायचे होते. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने वैद्यकीय अधिक्षक अमित सरदेसाई यांनी १०८ वर रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details