औरंगाबाद - मनसे कार्यकर्त्यांनी एका डॉक्टरला चोप दिल्याची घटना वैजापूर तालुक्यात समोर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी मनसैनिकांनी डॉक्टरला मारहाण करून त्याच्या अंगावर काळी शाही फेकून त्याच्या कृत्याचा निषेधही केला आहे.
VIDEO : राज ठाकरेंच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या डॉक्टरला मनसैनिकांचा चोप
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील डॉक्टरला मनसैनिकांकडून मारहाण...मनसे अध्यक्ष राज ठाकरे बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या रागातून केली मारहाण.... डॉक्टर शत्रुघ्न थोरातांनी माफी मागून करून घेतली सुटका...
डॉक्टरला मनसैनिकांचा चोप
थोरात यांना चोप देत असताना कार्यकर्त्यांनी डॉक्टरच्या अंगावर काळी शाई फेकून निषेध केला. यावेळी डॉक्टर थोरात यांनी माफी मागून आपली सुटका करून घेतली, असल्याची माहिती सुत्रांनी दिली.