औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील वजनापूर गावात एका विचित्र आळीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढऱ्या रंगाची ही आळी असून लांबून सापासारखी दिसते. पूर्ण गावात ही आळी दिसत असल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.
गंगापूरमध्ये आढळली विचित्र प्रकारची आळी; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - वजनापूर
वजनापूर गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून रिकाम्या जागेवर, भिंतींवर, घरांच्या अंगणात ही आळी दिसून येत होती. घरात प्रवेश करणाऱ्या अळ्यांना गावकऱ्यांनी कीटकनाशक टाकून मारून टाकले. मात्र, आळ्या दुसऱ्या ठिकाणाहून मार्ग काढत घरात येत असल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पांढऱ्या रंगाची ही आळी असून 20 ते 50 फूट लांब रांग करून ती आपली वाट काढताना दिसत होती. नेमकी ही कोणती आळी आहे याबाबत गावकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. लष्करी आळीप्रमाणे ही आळी पिकांचे नुकसान करेल अशी भीती गावकऱ्यांना आहे. त्यामुळे या आळ्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.