महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांनी केली औरंगाबादच्या गीताबन कोविड हॉस्पिटलची पाहणी - devendra fadnavis latest news

आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष गीताबन हॉस्पिटलला भेट दिली. तसेच हॉस्पिटलची पाहणी करून आमदार प्रशांत बंब यांचे कौतूक केले. फक्त दहा दिवसांत शंभर बेडचे अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभारले. त्याचे उद्घाटन ज्यावेळी मी ऑनलाइन केले, त्यावेळी हे हॉस्पिटल एवढे अद्यावत असेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस केली औरंगाबादच्या गीताबन कोविड हॉस्पिटलची पाहणी

By

Published : May 18, 2021, 9:37 PM IST

Updated : May 19, 2021, 5:25 PM IST

औरंगाबाद -गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघातील जनतेसाठी 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सुसज्ज हॉस्पिटलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन उदघाटन केले होते. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष गीताबन हॉस्पिटलला भेट दिली. तसेच हॉस्पिटलची पाहणी करून आमदार प्रशांत बंब यांचे कौतूक केले. फक्त दहा दिवसांत शंभर बेडचे अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभारले. त्याचे उद्घाटन ज्यावेळी मी ऑनलाइन केले, त्यावेळी गीताबन कोविड हॉस्पिटल एवढे अद्यावत असेल, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आटोक्लेव्ह मशीनचे उदघाटन -

गीताबन कोविड हॉस्पिटलमध्ये आटोक्लेव या मशीनची उभारणीही करण्यात आली आहे. या मशीनद्वारे निर्जंतूकीकरण केले जाते. या मशीनचे उद्घाटनही आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या मशीनमध्ये कोविड रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉटल्स 150 डिग्री तापमान सेल्सिअसमध्ये निर्जंतुक केल्या जातात, अशी माहिती आमदार बंब यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - मराठा आरक्षण : सरकारच्या बैठका म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्याचा प्रकार - प्रवीण दरेकर

Last Updated : May 19, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details