औरंगाबाद- पैठण तालुक्यातील आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातुन पाणी सोडावे अन्यथा २१ मे रोजी औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा बंद करू, असा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेने दिला आहे.
'आपेगाव हिरडपुरी धरणात पाणी न सोडल्यास औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा बंद करू' - औरंगाबाद
२१ मे रोजी औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सुर्यवंशी यांनी दिला आहे.
जवळपास ८५ गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या दोन्ही बंधारे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी ८५ गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून वेगवेगळ्या पातळीवर अंदोलन सुरू आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र वेळ काढुची भुमिका बजावत असल्याचा अरोप शेतकीर करत आहेत.
शेतकऱ्यांनी पाण्या वाचुन मरण्यापेक्षा पाण्यासाठी मरू असा नारा दिला आहे. तर २१ मे रोजी औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सुर्यवंशी यांनी दिला आहे. पैठण ते औरंगाबाद चे अंतर ५० किलोमीटरचे आहे. यादरम्यान शेतकरी नेमके कुठल्या ठिकाणी अंदोलन करणार याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली आहे.